
Shahid Diwas 2021 Images: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक शूर विरांनी देशासाठी बलिदान दिलं होतं. हसतमुखाने आपले जीवन अर्पण करणाऱ्या वीरांच्या आठवणी दरवर्षी जाण्या होतात. दरवर्षी 23 मार्च हा शहीद दिवस (Shaheed Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 23 मार्च 1931 ला क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या तिघांनी प्राणाची बाजी लावली. भारतात प्रामुख्याने दोन वेळा शहीद दिवस साजरे केले जातात.
दरवर्षी 23 मार्च आणि 30 जानेवारी रोजी शहीद दिवस साजरा केला जातो. देशासाठी हुतात्मा झालेल्या शुरविरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 23 मार्च आणि 30 जानेवारी हे दोन्ही दिवस भारताच्या इतिहासासाठी महत्त्वाचे दिवस आहेत. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. तसेच 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे या तीन क्रांतिवीरांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. शहीद दिवस निमित्त Messages, Greeting, Whatsapp Status च्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू या क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील. (वाचा - Shaheed Diwas 2021 Date and History: शहीद दिवसाची तारीख, माहिती आणि इतिहास जाणून घ्या )






इंग्रजांनी लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्ज केला. यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घातल्या. या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा दिली. या तिघांनी अगदी हसतमुखाने फाशीची शिक्षा स्विकारली होती.