
Shab-e-Barat Mubarak 2021 Messages: इस्लामच्या चार मुकद्दस रात्रींपैकी एक शब-ए-बारात होय. हिजरी दिनदर्शिकेच्या (Hijri Calendar) शबान (Shabaan) महिन्याच्या 14 तारखेला सूर्यास्तानंतर शब-ए-बारात साजरी केली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव रात्रभर घर किंवा मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना करतात. तसेच स्मशानभूमीमध्ये जाऊन आपल्या पूर्वजांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करतात. सूर्यास्त झाल्यानंतर शब-ए-बारात हा सण साजरा केला जातो. शब-ए-बारातची रात्र लैलात-उल-बारा (Laylat-ul-Barra) आणि मोक्षाची रात्र (Night of Salvation) म्हणूनही ओळखली जाते. इस्लाममध्ये ही पाक रात्री फार महत्वाची आहे, म्हणून या रात्री जगभरातील मुस्लिम अल्लाहला त्यांच्या पापांची क्षमा आणि त्यांच्या पूर्वजांसाठी आशीर्वाद मागतात. शब-ए-बारातच्या रात्री मशिदी आणि स्मशानभूमीची खास सजावट केली जाते, जिथे लोक स्वत: साठी आणि आपल्या पूर्वजांसाठी अल्लाहला प्रार्थना करतात. याबरोबरचं मशिदींमध्ये नमाज करून लोक देवाला त्यांच्या पापांची क्षमा करण्यास सांगतात.
रमजानचा पवित्र महिना सुरू होण्याच्या 15 दिवस आधी शब-ए-बारात चा सण साजरा केला जातो. शब-ए-बारात हा शबान महिन्याच्या 14 आणि 15 तारखेच्या मध्यभागी साजरा केला जातो. या पाक रात्री आपण आपल्या प्रियजनांना हिंदी संदेश, व्हॉट्सअॅप स्टिकर्स, शायरी, फेसबुक ग्रीटिंग्ज आणि फोटो एसएमएसद्वारे शब-ए-बारातच्या शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Shab-e-Barat 2021: 'शब-ए-बारात'साठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी; 'मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करावे')
रात को नया चांद मुबारक, चांद को चांदनी मुबारक,
फलक को सितारे मुबारक, सितारों को बुलंदी मुबारक,
आपको हमारी तरफ से, शब-ए-बारात मुबारक

अगर मुझसे कोई गलती हो गई हो, तो मुझे माफ कर देना...
आज शब-ए-बारात है, खुदा की इबादत कर लेना...
शब-ए-बारात मुबारक

रहमतों की आई है रात, दुआ है आप सदा रहें आबाद,
दुआ में रखना हमें भी याद, मुबारक हो आपको शब-ए-बारात.
शब-ए-बारात मुबारक

या अल्लाह मैं तुझसे मांगता हूं,
ऐसी माफी जिसके बाद कोई गुनाह न हो,
ऐसी सेहत जिसके बाद कोई बीमारी न हो,
ऐसी रजा जिसके बाद कोई नाराजगी न हो.
शब-ए-बारात मुबारक

अल्लाह, तूने मुझे यह सुंदर जीवन दिया है,
तूने ही ये मुबारक रात दी है,
तू ही मेरा आने वाला कल संवारेगा,
तेरी रजा में ही मुझे खुशियां मिलेंगी.
शब-ए-बारात मुबारक

असं म्हणतात की, शब-ए-बारातच्या रात्री प्रार्थना करुन अल्लाह आपल्या लोकांची सर्व पापं क्षमा करतो. म्हणून लोक शब-ए-बारातच्या रात्री अल्लाहला प्रार्थना करतात आणि त्यांच्या पापांची क्षमा मागतात. इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी अल्लाह संपूर्ण जगाचा लेखाजोखा तयार करतो आणि लोकांसाठी काम, क्षमा आणि शिक्षा करतो. शब-ए-बारातच्या रात्री लोक कुरान आणि देवाची प्रार्थना करतात.