
Dhulivandan 2024 Messages In Marathi: भारतात होळी (Holi 2024) आणि धुलिवंदनाचा (Dhulivandan 2024) सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. सोमवार म्हणजेच 24 मार्च रोजी होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच 25 मार्च रोजी धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा होईल. होळी हा दोन दिवसांचा सण असून हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. हा वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या शेवटी साजरा होणार हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. होळीचा उत्सव पौर्णिमेच्या संध्याकाळी सुरू होतो.
देशभरात धुलिवंदनाच्या दिवशी एकमेकांना रंग लावला जातो. या दिवशी लोक एकमेकांना खास धुलिवंदनाच्या शुभेच्छा देतात. तुम्हाला देखील धुलिवंदनानिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना खास मराठमोळ्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी खास धुलिवंदन शुभेच्छा, धुलिवंदन एसएमएस, धुलिवंदन प्रतिमा, धुलिवंदन WhatsApp स्टेटस, धुलिवंदन मेसेज घेऊन आलो आहोत. खालील मेसेज पाठवून तुम्ही धुलिवंदनाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Holika Dahan 2024: होलिका दहन कोणी पाहू नये आणि का? जाणून घ्या, पूजेची पद्धत)
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
धूलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धूलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव
ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव,
होऊ तल्लीन सप्तसुरात,
रंगवू एकमेकांना सप्तरंगात.
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,
प्रेम भाव निर्माण करू,
मिटवूया एकमेकातला वाद
खेळूया रंग उधळूया रंग,
तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा…!

होळी हा रंगांचा उत्साही आणि आनंदाचा सण आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे करण्यात येते. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि गाणी गातात. महाराष्ट्रात धुलिवंदनालाचं धुरवडी असंही म्हणतात. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचं जण धुरवडीचा आनंद लुटतात.