Saphala Ekadashi 2019: सफला एकादशी साजरी करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त
Lord Vishnu (Photo Credit - Facebook)

Saphala Ekadashi 2019: सफला एकादशी च्या दिवशीअनेकजण भगवान विष्णूच्या उपासनेसाठी व्रत करतात, हिंदू कालदर्शिकेनुसार, ही एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला साजरी केली जाते तर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या एकादशीचा मुहूर्त असतो. या एकादशीच्या नावातच या व्रताचे उद्दिष्ट दडले आहे. हिंदी भाषेत 'सफला' म्हणजेचज यश प्राप्त करणे, समृद्ध होणे या व्रताच्या निमित्ताने आपण करत असणाऱ्या कामात सफलता मिळावी याकरिता प्रार्थना केली जाते. देशातील अनेक राज्यात हा दिवस आवर्जून पाळला जातो, आज 22 डिसेंबर रोजी यंदाच्या सफला एकादशीचा मुहूर्त आहे याच निमित्ताने या दिवसाचे महत्व आणि पूजेचा मुहूर्त जाणून घेऊयात..

सफला एकादशी कथा आणि महत्व

पद्मपुराणाच्या अनुसार, चंपावती नगरात महिष्मान नामक एका राजाचे राज्य होतेमी त्यांचा मोठा मुलगा लूंभक कुप्रवृत्तीच्या आहारी गेला होता, त्यामुळेच त्याला वाईट आणि पापी कामे करण्यात अधिक रस होता, या सवयिंचा त्रास राज्याला आणि राजाला जाणवू लागला म्ह्णूनच एके दिवशी वैतागून राजाने त्याला राज्यभर हाकलून दिले. अशा वेळी लूंभक जंगलात राहू लागला, त्याच्या पूर्व कामांमुळे कोणीही त्याला मदत करत नसे उपाशी पोटी वणवण करणारा लूंभक कधी झाडाची फळे खाऊन तर कधी पालापाचोळा खाऊन दिवस रेटत होता.

अशा वेळी पौष मासातील कृष्ण पक्ष दिवशी त्याला काहीही खायला मिळाले नाही त्याच रात्री भुकेने कळवळत असताना त्याने विष्णूकडे आपल्या पापांची क्षमा मागितली, या प्रायश्चितामुळे राजा महिष्मान याला आपल्या मुलाला परत बोलवण्याची सुबुद्धी सुचली, यावेळी मात्र राज्यात परतताना लूंभकची वर्तणूक पूर्ण बदलली होती. महिष्मान राजाच्या मृत्यूपश्चात लूंभकने राज्याची देखभाल केली. या दिवशी अनावधानाने लूंभकाने केलेल्या उपवासापासून त्याची सफलता झाली म्ह्णूनच पुढे हा दिवस सफला एकादशी म्ह्णून ओळखला जाऊ लागला.

शुभ मुहूर्त:

सफला एकादशी तिथि: रविवार 22 डिसेंबर 2019

एकादशी तिथि प्रारंभ: 21 डिसेंबर 2019 संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटे

एकादशी तिथि समाप्‍त: 22 डिसेंबर 2019 दुपारी 3 वाजून 22 मिनिटे

सफला एकादशी ही विष्णू पूजेसाठी ओळखली जाते त्यामुळे देशातील विष्णू मंदिरात या दिवशी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही जण या व्रतात उपवास करतात हा उपवास एकादशीच्या दिवशी सुरु होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो.ज्यांना पूर्ण दिवसाचा उपवास करणे शक्य नसते त्यांनी अंशतः उपवासाचे पदार्थ काहून अर्ध्या दिवसाचा म्हणासह 12 तासांचा उपवास ठेवला तरी चालते.