स्वच्छता आणि समाजसेवेचे व्रत घेतलेले संत गाडगे बाबा महाराज यांचे विचार हे नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरतील असेच आहे. संत ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्रातील पहिले संत म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला, नाथांनी त्यावर इमारत बांधली आणि तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. यांचे उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिद्धीस नेले. म्हणून त्यांना संत मालिकेतील 'शिरोमणी' म्हणून संबोधले जाते. अशा महान संताचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगावात झाला. त्यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी बोलू तेवढे थोडेच आहे.
संत गाडगे बाबांचे विचार समाजाला, समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला अमूल्य सल्ला, शिकवण देऊन जातात.
पाहूयात त्यांचे हे अमूल्य विचार:
1) दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.
2) माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.
3) अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकवा.Sant Gadge Baba Birth Anniversary 2019: शिक्षण, स्वच्छता, मानवता यांचा प्रसार करणाऱ्या 'संत गाडगेबाबा' यांच्या बद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी!
4) दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका
5) जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.
6) दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.
7) धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.
8) माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.
9) शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.
10) सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर (ढोंगी)
गाडगे बाबा यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत गाव स्वच्छ ठेवणाऱ्या गावकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.