आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2020) पार पडत आहे. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठल पादूकांनी (Shri Vitthal Paduka) आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री विठ्ठल पादुकांसोबत भक्त पुंडलिक ( Bhakta Pundalik Paduka) आणि संत नामदेव पादुकांनीही (Sant Namdev Paduk) आळंदीकडे प्रस्थान ठेवले. परंपरेनुसार आषाढी यात्रेवेळी सर्व संतांच्या पादुका विठ्ठल चरणी दर्शनासाठी येत असतात. परंतू, कैर्तिकी वैद्य एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्या वेळी स्वत: विठुराया उपस्थित राहतो असे सांगितले जाते. त्यामुळेच विठ्ठल पादुका संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीला प्रस्थान ठेवत असतात.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या फुलांनी सजवलेल्या बसमधून या पादूका आळंदीकडे मार्गस्थ झाल्या.सकाळी 9 वाजता 20 वारकऱ्यांसोबत या पादूकांनी प्रस्थान ठेवले. मंदिर समितीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधीवतपणे पादुकांचे पूजन केले. (हेही वाचा, Kartiki Wari 2020: संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी वर कोरोनाचं सावट; संचारबंदी लागू असल्याने यंदा असा असेल कार्यक्रम)
दरम्यान, आळंदी येथे पार पडणारा संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 724 वे वर्ष आहे. या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासानाने संचारबंदी लागू केली आहे. कार्तिकी एकादशीला येत्या 13 डिसेंबर रोजी याठिकाणी समाधी सोहळा पार पडत आहे.
कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमावर प्रशासन मोठ्या प्रमाणावर सज्ज झाले आहे. प्रतिवर्ष या ठिकाणी 4 ते 5 लाख भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी होणारी गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जेणे करुन गर्दी होणार नाही आणि कोरोना व्हायरस आटोक्यात येईल. या परिसरात 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू आहे. तसेच सर्व नियमांचे पालन करुन कमाल 20 ते किमान 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.