Palkhi प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Twitter)

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानानंतर आज (11 जून) आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) प्रस्थान ठेवणार आहे. मागील 350 वर्ष जुनी ही वारकरी संप्रादयाची वारीची परंपरा आजही उत्साहात कायम आहे. यंदा या पालखी सोहळ्याचं 338 वं वर्ष आहे, त्यासाठी वैष्णवांचा मेळा अलंकापुरी मध्ये जमला आहे. आजपासून टाळ- मृदुंगाच्या तालावर वारकरी आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे रवाना होतील. पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वाहतूकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माऊलींचा पालखी सोहळा गांधी वाडा येथील आजोळघरी आळंदी मुक्कामी असते. त्यानंतर दोन दिवसांनी सासवड मुक्कामास दिवे घाटातून तिचा प्रवास सुरू होतो. पायी मजल- दर मजल करत ही पालखी 28 जूनला पंढरपूरात दाखल होईल तर 29 जूनला विठूरायाचं दर्शन होणार आहे. Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आषाढी वारीच्या तुकोबारायांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू; इथे पहा थेट सोहळा (Watch Video) .

पहा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक

माऊलींच्या पालखीसाठी पुण्यातील वाहतूकीमधील बदल

पुण्यामध्ये 12 जून दिवशी काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले असून त्याला पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. 12 ते 15 जून पर्यंत वाहतूकीमध्ये या पालखी सोहळ्यांच्या अनुषंगाने काही बदल करण्यात आले आहेत.