Sankashti Chaturthi October 2020 Moon Rise Time: दर महिन्याला वद्य चतुर्थीचा दिवस हा गणेशभक्तांसाठी खास असतो. ऑक्टोबर महिन्याची यंदाची ही वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) खास असण्याचं अजून एक म्हणजे ही अधिक महिन्यातील चतुर्थी आहे. आज 5 ऑक्टोबर दिवशी गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास करून गणपती बाप्पाचे आशिर्वाद घेणार आहेत. 2020 हे लीप वर्ष आणि सोबतच दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास असा एकत्र आल्याने या वर्षी 13 संकष्टी चतुर्थींचं पुण्य आणि बाप्पाचा आशिर्वाद गणेशभक्तांना मिळणार आहे. दरम्यान अधिक महिना हा देखील खास असतो. यामध्ये जावयाचे लाड, त्याला गोडा-धोडाचे जेवण ते भेटवस्तू देण्याचा मान अनेक कुटुंबांमध्ये पाळला जातो. या सोबतीनेच अधिक महिन्यात शुभ प्रसंग टाळून व्रत वैकल्यं करण्याच्या देखील धार्मिक रूढी-परंपरा आहेत. पण आज तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार असाल तर जाणून घ्या नेमकी आज चंद्रोदयाची वेळ काय? संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं कराल? Sankashti Chaturthi Wishes: संकष्टी चतुर्थी च्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातुन देत करा गणरायला वंंदन.
सर्वसामान्यपणे संकष्टी चतुर्थीचं व्रत हे श्रीगणेशाची आराधना करण्यासाठी केले जातं. कोविड 19 च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तुम्हांला गणेश मंदिरामध्ये आज जाणं शक्य होणार नसल्याने घरच्या घरी गणरायाची पूजा करा. बाप्पाला जास्वंदाचं फूल, दुर्वा प्रिय असल्याने त्या अर्पण करा. उपवास करणार असल्यास अनेक जण चंद्रोदयाची वेळ पाहून रात्री उपवास सोडतात. त्याआधी बाप्पाची आरती करा.
संकष्टी चतुर्थी तिथी तारीख व चंद्रोदयाची वेळ
संकष्टी चतुर्थी तारीख - 5 ऑक्टोबर, 2020
आज रात्री चंद्रोदयाची वेळ -
मुंबई- 8.42
पुणे- 8.38
नाशिक - 8.37
नागपूर- 8.13
रत्नागिरी - 8.43
दरम्यान आजची संकष्टी चतुर्थी ही अश्निन मासातील असल्याने गणपती बाप्पासोबतच आज मलमासाची देवता भगवान विष्णू आणि भगवान शंकराची देखील आराधना केली जाणार आहे. दरम्यान संकष्टी आणि चंद्र दर्शन ही देखील संकष्टीचा उपवास ठेवणार्यांसाठी महत्त्वाचा विधी असल्याने अनेकजण रात्री चंद्र दर्शनानंतर बाप्पाला, चंद्रदेवाला नैवेद्य दाखवत दिवसभराचा उपवास मोडतात. आजच्या रात्रीच्या जेवणात अनेकजण गोडाच्या पदार्थात उकडीच्या मोदकाचादेखील नैवेद्य दाखवतात.