Sankashti Chaturthi March 2024 Moonrise Timings: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आज पहा मुंबई, पुण्यात चंद्रोदयाची वेळ काय?
Ganpati Photo 3

कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस हा संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) दिवस आहे. मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज 28 मार्च दिवशी आहे. अनेक गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस हा खास असतो. या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना केली तर दु:खाचा नाश होतो आणि सुख- समृद्धीची भरभराट होते अशी धारणा आहे. त्यामुळे अनेक भाविक गणेश चतुर्थीला एक दिवसाचा उपवास देखील करतात मात्र हा उपावास संध्याकाळी चंद्रोदयानंतर सोडण्याचा देखील नियम काही जण पाळतात. मग आज तुम्ही देखील चंद्रोदयाची वेळ पाहून संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सांगता करणार असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरामधील आजची चंद्रोदयाची वेळ काय आहे?

पहा मुंबई, पुणे सह विविध शहरांमधील चंद्रोदयाची आजची वेळ

मुंबई- 21.27

पुणे - 21.22

नाशिक - 21.24

नागपूर -21.04

कोल्हापूर - 21.17

औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) -21.18

गोवा - 21.17

बेळगाव - 21.15

( नक्की वाचा: Dwijapriya Sankashti Chaturthi 2024: द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या, त्याचे आध्यात्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत).

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा नैवेद्य देखील खास असतो. या दिवशी गणपती बाप्पाच्या आवडीच्या मोदकाची मेजवानी असते. महाराष्ट्रात विविध प्रांतानुसार, आवडीनुसार तळणीचे, उकडीचे मोदक केले जातात. काही जण संकष्टी चतुर्थीच्या जेवणात कांदा- लसून विरहित पदार्थांचा समावेश करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाची आरती करून त्याला नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पूजेमध्ये दूर्वा, जास्वंदाचं फूल बाप्पाला अर्पण करण्याची प्रथा आहे.