Sankashti Chaturthi 2019: कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आधी गणेशाला वंदन केले जाते. गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन नवीन कार्याची अथवा शुभकार्याची सुरुवात केली जाते. अशा या लाडक्या गणरायाचे सेवा करण्याचा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी. दर महिन्यात येणा-या संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजाअर्चा केल्यास आपल्यावरील आलेले संकटं दूर होऊन कोणत्याही शुभकार्यात काही अडथळा आला असेल तर तो दूर होण्यास मदत होते. असं म्हंटलं जातं की, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास सुख-समृद्धी, शांती लाभते. यासोबतच भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात.
अशा या मंगलदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला नक्कीच Greetings, Wallpapers, Whatsapp Status ची गरज पडेल. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत संकष्टी चतुर्थी शुभेच्छा देणा-या HD Images:
हेदेखील वाचा- उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे !
संकष्टी दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. यादिवशी सकाळी उठून घरी गणपतीची पूजा केली जाते तसेच गणपती मंदिरामध्ये गणेशाची पूजा आणि दर्शन घेतले जाते. शक्य असल्यास गणेशभक्त उपवास ठेवतात. संकष्टी दिवशी लसुण, कांदा विरहीत जेवण बनवलं जातं. नैवेद्याला गोडाचा पदार्थ किंवा मोदक बनवले जातात. आज असणा-या संकष्टी चतुर्थीच्या लेटेस्टली मराठीच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा!