Sai Baba Marathi Songs: साईंचा अगाध महीमा काही शब्दांतून व्यक्त करणारी साईबाबांची '5' सुरेल मराठी गाणी
Sai Baba (Photo Credits: Shirdi Saibaba Sansthan Facebook)

Shirdi Sai Baba Marathi Songs: साईबाबांची महती ही शब्दांत व्यक्त होणार नाही अशीच आहे. त्यांचा महिमा अपरंपार आहे. अशा या साईं चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक शिर्डीस (Shirdi) साईंच्या दर्शनासाठी जातात. येत्या 7 ऑक्टोबरला हिंदू पंचांगानुसार साईंची 101 वी पुण्यतिथी (Sai Baba Death Anniversary)आहे. 1918 मध्ये दसऱ्याच्याच दिवशी ते अनंतात विलीन झाले होते, असे पुराणकथेत म्हटले आहे. असे म्हणतात की साईबाबा फकीर होते. कोणी त्यांना फकीर म्हणतात, कोणी संत, कोणी साधू तर कोणी देव. प्रत्येकासाठी साईंची रुपे जरी वेगवेगळी असली तरी साई या भक्तांचे श्रद्धास्थान आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. श्रद्धा-सबुरी यासारखा महामंत्र दिलेल्या साईंच्या भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी साईंची 5 सुरेल मराठी गाणी:

जो तो बोलू लागला साईबाबा

लिंबाखाली प्रकट झाला

तुला खांद्यावर घेईन

शिर्डीचे द्वारका साईनाथ

हेही वाचा- Shirdi Sai Baba Punyatithi Utsav 2019: श्री साईबाबा यांच्या 101 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री शिर्डी साईसंस्थानातर्फे विशेष सोहळा, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

पायी शिर्डीला येतो साईनाथा

शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” हे साईंचे बोल होते.