सचिन तेंडूलकर-अंजली तेंडूलकर ( Photo Credit: ANI )

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. यात मुंबईचे गणपती अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळते. सेलिब्रेटीही दर्शनासाठी आर्वजून हजेरी लावतात.

यंदा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याने सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

याशिवाय मुकेश अंबानी, अमित शहा, अशोक चव्हाण या दिग्गज नेत्यांनी लालबागच्या राजाच्या दर्शन घेतले होते.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा असतात. दर्शनासाठी 24 तास तर कधी त्याहूनही अधिक वेळ लागतो. दर्शनासाठीची एक रांग आणि नवस फेडणाऱ्यांची दुसरी रांग अशा वेगवेगळ्या रांगा तिथे लावल्या जातात. नवस फेडणाऱ्यांच्या रांगेतून गेल्यास भक्तांना गणरायाच्या चरणांना स्पर्श करण्याची संधी मिळते तर जनरल रांगेतून 10 फुटांच्या अंतरावरुन दर्शन करावे लागते.