Special Gifts (Photo Credits - Twitter)

Rose Day 2025 Gift Ideas: फेब्रुवारी हा महिना प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. या खास महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची पद्धत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी खास मानला जाणारा हा आठवडा उद्या पासून म्हणजेच 7 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. उद्यापासून व्हॅलेंटाईन सप्ताहाला सुरुवात होणार असून या दिवशी जगभरात 'रोज डे' (Rose Day)  साजरा केला जाईल.  7 फेब्रुवारी रोजी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. प्रेमाची कबुली किंवा मनातील भावना व्यक्त करण्याचा हा उत्तम दिवस आहे.  रोज डे ला आवडत्या व्यक्तीला गुलाब देण्याची पद्धत आहे. मात्र हे गुलाब थोड्या विशिष्ट पद्धतीने किंवा हटके अंदाजात तुमच्या जोडीदाराला दिले तर कदाचित ते देण्यामागे तुमची भावना त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल. हेही वाचा:  Valentine's Week 2025: 'व्हॅलेंटाईन वीक' ला होणार उद्यापासून सुरुवात, जाणून घ्या, रोज डे पासून ते व्हॅलेंटाइन डे पर्यंतची संपूर्ण माहिती

पाहा, Rose Day निमित्त केल्या जाऊ शकतात अशा भन्नाट आयडियाज:

1. गुलाबांचा गुच्छ: आकर्षक पद्धतीने सजवलेला गुलाबांचा गुच्छा तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीला देऊ शकता. गुलाबांच्या फुलांची सुंदर पद्धतीने सजावट केल्यास तुमच्या जोडीदारा आणखी खास वाटेल.

2. रोज कुकीज: जर तुम्हाला रोझ डे निमित्त हटके काही द्यायचे असेल तर तुम्ही रोझ डे निमित्त रोझ फ्लेव्हरची पेस्ट्री, कुकीज भेट म्हणून देऊ शकता.

3. रोज परफ्युम: जर तुमच्या जोडीदाराला परफ्युम आवडत असतील तर तुम्ही रोजचा परफ्युम देऊ शकता. हि एक उत्तम भेट असू शकते.

4. रोज ज्वेलरी: तुम्ही गुलाबाच्या आकाराचे लॉकेट्स, पेंडंट्स, रिंग, ब्रेसलेट, ईअरिंग्स भेट म्हणून देऊ शकता. आणि प्रेयाकाराला रोझच्या आकाराचा ब्रोच किंवा रिंग भेट म्हणून देऊ शकता.  रोज डे निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता. मात्र त्यांची कनेक्शन कुठे ना कुठे तरी प्रेमाशी, गुलाबाशी, हृद्याशी असलेले पाहिजे एवढे फक्त लक्षात ठेवा.