
Republic Day 2021 Messages in Hindi & HD Photos: आज म्हणजेचं 26 जानेवारी 2021 रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. संपूर्ण देशभर हा दिवस अतिशय उत्सहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 72 व्या प्रजासत्ताक दिनी WhatsApp Status, Patriotic Quotes, SMS, GIFs, Greetings, Images, Wallpapers आणि Wishes शेअर करून आपल्या मित्र-परिवाराला खास शुभेच्छा नक्की द्या.
26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. दरवर्षी या दिवशी, भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. (वाचा - Happy Republic Day 2021 Messages in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Stickers द्वारे देऊन साजरा करा राष्ट्रीय सण!)





प्रजासत्ताक दिन शुभेच्छा व्हिडिओ -
भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. या दिवशी भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढली जाते.