
National Youth Day 2020: असं म्हणतात, की कोणत्याही देशाचे भविष्य हे नेहमी तिथल्या तरुणांच्या हातात असते. विचारांनी प्रगल्भ, आणि उत्साहाने परिपूर्ण असे हे तरुण ज्या दिशेने काम करतात त्याच दिशेने देशाची वाटचाल होत असते. भारताची लोकसंख्या पाहिल्यास यातही सर्वाधिक तरुण वर्ग आहे. याच वर्गासाठी दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावर युवा (Rashtriya Yuva Diwas 2020) दिवस साजरा केला जातो, हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती (Swami Vivekananda Jayanti) असते, विवेकांनद यांनी अगदी कमी वयातच आपल्या विचारांनी जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती, त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रेरणा मिळावी याकरिता हा दिवस निवडला गेला आहे. आज,स्वामी विवेकानंद यांची 157वी जयंती आहे, या निमित्ताने आज सुद्धा साजऱ्या केल्या जाणाऱ्या युवा दिनाच्या निमित्ताने तुमच्या ओळखीतील सर्व तरुणांना, मित्र मैत्रिणींना या खास Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
अलीकडे कुठल्याही खास दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याला विशेष महत्व आहे. मात्र यासाठी मोठेमोठे मॅसेज शोधताना दमछाक होते तसेच वाचणाऱ्याला पण कंटाळा येतो, त्यातही जर का तुम्हाला तरुणांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यांच्या वेळेचा विचार हा केलाच गेला पाहिजे. हीच बाब लक्षात घेऊन शुभेच्छा देणाऱ्याच्या व वाचणाऱ्याचा वेळ वाचवतील अशी काही फ्री टू डाउनलोड आणि रेडिमेड शुभेच्छापत्रे तुम्ही इथे पाहू शकता.
राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रीय युवा दिवसाच्या खूप शुभेच्छा

राष्ट्रीय युवा दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा

राष्ट्रीय युवा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रीय युवा दिवसाच्या खूप खुप शुभेच्छा

Happy National Youth Day 2020

राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1985 पासून झाली आहे, याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा 12 ऑगस्ट रोजी युवा दिवस साजरा केला जातो. आजच्या या खास दिवशी समस्त तरुण वर्गाला खूप खूप शुभेच्छा तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचार तुमच्याही आयुष्यात अवलंबता यावेत यासाठी ऑल द बेस्ट!