11 May Ifatr Time & 12 May Sehri Time: 7 मे पासून भारतामध्ये इस्लामिक कॅलेंडरमधील पवित्र महिना रमजानला(Ramzan) सुरूवात झाली आहे. या काळात कुराण या मुस्लिम बांधवांच्या पवित्र ग्रंथामध्ये सांगितल्यानुसार, दिवसभर निर्जळी उपवास करण्याची पद्धत असते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर 'इफ्तार' (Iftar Timing) च्या वेळेवर खजूर आणि पाणी पिऊन उपवास सोडला जातो तर सकाळी 'सेहरी'च्या (Sehri Timing) वेळेपर्यंत मेजवानीचा आनंद घेता येतो. आज शनिवार, 11 मे दिवशी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरात 11 मे ची इफ्तार आणि 12 ची सेहरीची वेळ काय? हे नक्की जाणून घ्या. Ramadan 2019 Iftar & Sehri Timetable: 'इफ्तार' आणि 'सेहरी' ची मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरातील वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा
11 मे इफ्तार आणि 12 मे सेहरीची वेळ काय?
आज 11 मे दिवशी मुंबईमध्ये इफ्तारची वेळ संध्याकाळी 7.05 मिनिटांची आहे. दुसर्या दिवशी सकाळी 4.46च्या सेहरीच्या वेळेपर्यंत मेजवानीचा आनंद घेता येणार आहे.तर पुण्यामध्ये आज संध्याकाळी 7.00 वाजण्याची इफ्तारची वेळ आहे तर सकाळी 4.43 ही सेहरीची वेळ आहे. नाशिकमध्ये आज संध्याकाळी 7.03 ही इफ्तारची वेळ आहे आणि सेहरी सकाळी 4.40 पर्यंत आहे. तर औरंगाबादमध्ये संध्याकाळी 6.57 ची इफ्तारची वेळ आहे आणि सेहरी 4.34 ची आहे. त्यामुळे रोजा ठेवणारी व्यक्ती स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी, डीहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून संध्याकाळी इफ्तारच्या वेळेपासून पहाटे सेहरीच्या वेळेपर्यंत आवडीचे पदार्थ खाण्याची मुभा आहे. Ramadan 2019 Iftar Special Food: मुंबई मधील मोहम्मद अली रोडवर 'इफ्तार' स्पेशल मेजवानीचा आनंद घेणार असाल तर हे 5 पदार्थ एकदा चाखायला हवेच!
रोजा ठेवणारी व्यक्ती इफ्तारच्या वेळेस खजूर आणि पाणी यांचे सेवन करून दिवसभराचा उपवास सोडते. 7 मे ते 4 जून 2019 च्या काळात यंदा रमजान महिना आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना अत्यंत पवित्र असतो.