Ramadan 2019 Iftar & Sehri Timetable: 'इफ्तार' आणि 'सेहरी' ची मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरातील  वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Mumbai, Pune , Nashik, Aurangabad Iftar & Sehri Timetable 2019:  मुस्लिम बांधवांसाठी पवित्र आणि खास असणारा रमजान (Ramzan) महिना यंदा 7 मे 2019 पासून सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये अवगुणांवर मात करण्यासाठी स्वतःमध्ये चांगले बदल करण्याची एक संधी म्हणजे रमजान माहिन्यातले उपवास ( रोजा) असतात. चंद्रोदयापासून चंद्रास्तापर्यंत या महिन्यात मुस्लिम बांधव निर्जळी रोजा (Ramzan Roza)  ठेवतात. संध्याकाळी खजूर (Khajur) आणि पाणी पिऊन हा उपवास सोडला जातो. त्यानंतर मेजवानीचा आस्वाद घेतला जातो. सकाळच्या वेळची सेहरी (Sehri) आणि संध्याकाळी इफ्तारची (Iftar) वेळ पाहून खाण्याचं वेळापत्रक ठरवलं जातं. पण भौगोलिक परिस्थितीनुसार चंद्रोदयाची आणि चंद्रास्ताची वेळ वेगळी असल्याने मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे शहरातील सेहरी (Sehri Time) आणि इफ्तारची (Iftar Time) वेळ पहा.

सेहरी हा शब्द सेहर या शब्दापासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ 'सकाळ' असा होतो. रमजान रोजाच्या दरम्यान सेहरीच्या पूर्वी खाण्यासाठी परवानगी असते. तर संध्याकाळी चंद्रास्तानंतर 'इफ्तार' च्या वेळेमध्ये खाण्याला सुरूवात केली जाते. Ramadan Mubarak 2019 Wishes And Messages:सुरु झाला रमजान; WhatsApp, Facebook, SMS च्या माध्यमातून द्या मित्रांसह आप्तेष्टांना शुभेच्छा!

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरातील सेहरी आणि इफ्तारची वेळ काय?

मुंबई सेहरी आणि इफ्तार 2019 वेळापत्रक 

मुंबईमध्ये कॉरपरेट क्षेत्रामध्ये काम करणार्‍या, ऑफिसचा वेळा आणि शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना रमजानच्या रोजाचं वेळापत्रक ठरवण्यासाठी Mumbai शहरातील सेहरी आणि इफ्तारची वेळ पीडीएफ वेळापत्रक स्वरूपात  डाऊनलोड करून ठेवा.

पुणे सेहरी आणि इफ्तार 2019 वेळापत्रक 

पुणे शहरही आता आयटी सिटी बनली असल्याने एमएनसीमध्ये काम करणारे अनेक तरूण तरुणींना रोजाचं वेळापत्रक सांभाळत आपलं कामदेखील सांभाळायचं आहे. त्यामुळे आजच Pune शहरातील इफ्तार आणि सेहरीचं वेळापत्रक डाऊनलोड करून ठेवा.

नाशिक सेहरी आणि इफ्तार 2019 वेळापत्रक 

भौगोलिक स्थितीनुसार चंद्रोदय, चंद्रास्ताची वेळ वेगवेगळी असते. त्यामुळे नाशिक शहरामध्ये तुम्ही रमजान रोजाच्या दिवसामध्ये असाल तर NASIK शहरातील इफ्तार आणि सेहरीचं वेळापत्रक डाऊनलोड करून ठेवा.

औरंगाबाद सेहरी आणि इफ्तार 2019 वेळापत्रक 

औरंगाबाद शहरातील मुस्लीम बांधवांसाठी रमजान महिन्यात रोजा ठेवणार असाल तर तर औरंगाबाद शहरातील इफ्तार आणि सेहरीची वेळ नक्की काय आहे? Aurangabad शहरातील इफ्तार आणि सेहरीचं वेळापत्रक डाऊनलोड करून ठेवा.

रमजानच्या रोजा दरम्यान तुम्ही डिहायड्रेट होणार नाहीत याची काळजी घ्या. आहाराच्या, आरोग्याच्या दृष्टीने रमजानच्या काळात वैद्यकीय सल्ल्याने बदल करा म्हणजे तुम्हांला त्रास होणार नाही.