
ईद उल-फित्र (Eid al-Fitr) अर्थात रमजान ईद हा जगभरातील मुस्लिमांद्वारे साजरा केला जाणारा एक प्रमुख इस्लामिक सण आहे. इस्लामिक चंद्र कॅलेंडरचा दहावा महिना, शव्वालचा पहिला दिवस म्हणून ही ईद महत्त्वाची आहे. हा दिवस श्रद्धा, एकता आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यातील उपवास अर्थात रोजे संपतात आणि श्रद्धापूर्वक पाळलेल्या महिन्याची सांगता आनंदाने एकमेकांची गळाभेट घेत केली जाते.मग अशा या खास दिनी रमजान ईदच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा करून हा सण आनंदाने नक्की साजरा करा.
यंदा भारत सरकार कडून देशभर ईदचा सण आणि सुट्टी 31 मार्च 2025 दिवशी जाहीर केली आहे. मात्र मुस्लिम बांधवांसाठी ईदची खरी तारीख ही चंद्र दर्शनावर अवलंबून आहे.
रमजान ईदच्या शुभेच्छा





मुस्लिम बांधवांच्या आस्थेनुसार, उपवास हा विश्वास मजबूत करण्याचा आणि अल्लाह च्या जवळ जाण्याचा एक मार्ग मानला जातो. इस्लामिक कॅलेंडर चंद्रदर्शनावर अवलंबून असल्याने, ईद अल-फित्रची तारीख दरवर्षी बदलते. ईदच्या सकाळी, अनेक मुस्लिम मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करतात.
रमजान ईद ही मित्रपरिवारासोबत एकत्र साजरी केली जाते. या निमित्ताने खास लहान मुलांना ईदी दिली जाते. तर घराघरात विविध पक्वान्न बनवली जातात. ईदच्या निमित्ताने एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. सारे जण एकत्र येऊन 'ईद मुबारक' शुभेच्छा देत हा दिवस साजरा करतात.