Ram Navami 2021 Hd  Image: रामनवमी Wallpapers, Messages, Images, Greetings, शेअर करुन कोरोना काळात घरुनच द्या आप्तेष्टांना  शुभेच्छा!
Ram Navmi | (File Image)

हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी येणारा सण म्हणजे श्रीरामनवमी (Happy Ram Navami 2021) काही लोक याला राम नवमी (Ram Navami) असेही म्हणतात. यंदाच्या वर्षी राम नवमी ही 21 एप्रिल या दिवशी आली आहे. भगवाण विष्णूचा सातवा आवतार म्हणून रामचंद्रांनी जन्म घेतला असे सांगितले जाते. रामायण आणि पुराणात याबाबत बरेच तपशील आढळतात. भगवान रामचंद्र हे अयोध्येचे राजा दशरत आणि राणी कौशल्या यांचे पूत्र होत. चैत्र नवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे या दिवसाला राम नवमी म्हणतात. या दिवशी रामजन्मोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी राम नवमी घरी थांबूनच साजरी करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्या आप्तेष्ठांना, नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी खास Ram Navami Hd Images, Wallpapers, Messages, Images, Greetings इथे देत आहोत. ज्याचा वापर करुन आपण साजरी करु शकता यंदाची राम नवमी.

रामनवमी यंदा काहीशी कडक निर्बंधात साजरी होणार आहे. महाराष्ट्र आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोना व्हायरस संक्रमित वाढत आहे. अवघ्या देशाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव टाळण्यावरच सरकारकडून भर देण्यात येत आहे. ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या त्या ठिकाणी निर्बंध घालण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

 

रावनवमी सणाबाबत कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलप वळसे पाटील यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 21 एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्यानुसार गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. लोकांनी एकत्र न येता घरीच साधेपणाने श्रीराम नवमी उत्सव साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, केवळ रामनवमीच नव्हे तर हनुमान जयंती आणि महावीर जयंती आदी उत्सवही साधेपणाने साजरे करण्याचे अवाहन राज्य सरकारने केले आहे. याबाबत माहिती देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, 'जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने महावीर जयंती उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोना विषाणूमुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महावीर जयंती उत्सवानिमित्त गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत'. हनुमान जयंतीबाबतही वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, 'राज्यात दरवर्षी हनुमान जयंती उत्सव एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु यंदा कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता आपापल्या घरी राहून साधेपणाने हनुमान जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन आहे. गृहविभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत'.