Happy Raksha Bandhan 2020 Images: रक्षाबंधन निमित्त HD Greetings, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून व्यक्त करा बंधुभगीनीचे प्रेम

देशभरातील भावा बहिणींच्या नात्याच्या आनंदाचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा होतो. या दिवशी बहिण मोठ्या प्रेमाणे आपल्या भावाला राखी बांधते. अत्यंत प्रेमाचा विश्वासाचा आणि आपूलकीचा असा हा क्षण असतो. गेली अनेक वर्षे चालत आलेली ही परंपरा. यंदाच्या वर्षीही पुढे चालत आहे. यंदाचे वर्ष मात्र काहीसे वेगळे आहे. जगभरात असलेल्या कोरोना व्हायरस संकट नियंत्रणासाठ लॉकडाऊन आहे. नागरिकांच्या हालचालिंवर मर्यादा आहे. त्यामळे रक्षा बंधनाच्या सणावरही बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या भाऊ, बहिणीला जर रक्षाबंधन शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी Raksha Bandhan HD Greetings, Wallpapers, Wishes Images इथे आहेत. यातील इमेजेस शेअर करुन आपण आपला आनंद, प्रेम व्यक्त करु शकता.

रक्षाबंधन शुभेच्छा एचडी इमेज

(हेही वाचा, Happy Raksha Bandhan 2020 Wishes: रक्षाबंधन निमित्त खास WhatsApp Stickers, Facebook Messages, GIF Greetings, HD Images, Shayari, SMS आणि वॉलपेपर्स पाठवून साजरा करा आजचा सण!))

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. बहिण विवाहीत असेल तर कधी भाऊ बहिणीच्या घरी जातो. कधी बहिण भावाच्या घरी जाते. सासरी नांदायला गेलेल्या अनेक मुली रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी येतात. त्या निमित्ताने आई, वडील, भाऊ, बहिण, आप्तेष्ट, जुने मित्र-मैत्रीण भेटतात. एकूणच हा दिवस आनंदाचा क्षण असतो.