
Rajmata Jijabai Punyatithi: महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना घडवण्यात मोलाचा वाटा असणार्या राजमाता जिजाऊ साहेब यांचा तारखेनुसार 17 जून हा पुण्यतिथीचा दिवस आहे. यंदा जिजाऊंना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी बाहेर पडण्यावर बंदी असली तरीही आज त्यांचं स्मरण करण्यासाठी सोशल मीडियामध्ये मराठीमोळी आणि प्रेरणादायी संदेश पाठवून त्यांचा करारीपणा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहचवू शकता. आज जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या दिनी स्मरण करून त्यांच्या पराक्रमाच्या गाथा पुढच्या पिढीला देणंदेखील गरजेचे आहे. फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेज, स्टेटसच्या माध्यममातून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे हे खास मराठमोळे मेसेज, इमेजेस (Images) नक्की शेअर करा. (हेही वाचा - Jijabai Death Anniversary 2020: राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील रोचक गोष्टी).
महाराष्ट्रात सिंदखेडचे लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. 1605 साली जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह संपन्न झाला. शहाजीराजेंच्या पश्चात त्यांनी शिवरायांना घडवण्यात, प्रसंगी हिंदवी स्वराज्याचा कारभार सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवरायांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर शंभु राजेंवरही त्यांनी आईप्रमाणे माया केली होती.
राजमाता जिजाऊंना आदरांजली

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता जिजाऊ यांच्या
पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!

तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ!

जिजाऊ...
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईंना आदरांजली !

राजमाता जिजाबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन!

राजमाता जिजाऊंच्या
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
जिजाबाई केवळ आदर्श आई नव्हे तर उत्तम शासक आणि पत्नी होत्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेक स्त्रियांसाठी आदर्श आहे. जिजाऊ या त्या काळातही बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. घर संसार आणि करियर यांच्यामध्ये कसरत करणार्या प्रत्येकीसाठी आजही त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रत्येक महिलेसाठी आदर्श आहे.