मुंबई: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज 428 वी जयंती (12 जानेवारी 2026) राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ज्या पवित्र मातीत जिजाऊंचा जन्म झाला, ते बुलढाणा जिल्ह्यातील 'मातृतीर्थ' सिंदखेड राजा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीने फुलून गेले आहे. पहाटेपासूनच लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात शासकीय महापूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, 'जय जिजाऊ, जय शिवराय'च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला आहे.
जिजाऊ जयंती 2026 खास शुभेच्छा संदेश:
Rajmata Jijau Quotes in Marathi
सोशल मीडियाच्या युगात आज सकाळपासूनच जिजाऊ जयंतीचे स्टेटस आणि शुभेच्छा संदेश व्हायरल होत आहेत. नागरिकांसाठी काही निवडक शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे आहेत:



ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा
12 जानेवारी 1598 रोजी जन्माला आलेल्या जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य निर्मितीचा आत्मविश्वास शिवरायांमध्ये जागवला. शहाजीराजे बंगळूरला असताना पुण्याचा कारभार आणि न्यायनिवाडा जिजाऊंनीच समर्थपणे सांभाळला होता. स्त्री-शक्ती, धाडस आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जयंतीचा हा दिवस केवळ उत्सव नसून तो मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प दिन मानला जातो.