प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Pune Ganeshotsav: राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्णसंख्या कमी झाले आहेत. त्यामुळे कोविड19 चे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशातच पुण्यात उद्यापासून निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पण काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आता नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यंदा गणेशोत्सव 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे.(राज्यातील सर्व मंदिर, प्रार्थना स्थळ हे लवकरच सुरु केले जातील- उद्धव ठाकरे)

गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करत असे स्पष्ट करण्यात आले आहे की, गणेश मंडळांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांशिवाय साजरा करावा. त्याचसोबत मंडळाने 4 फूट उंचीची तर घरगुती गणपतीची मुर्ती 2 फुंटापेक्षा अधिक मोठी नसावी. त्याचसोबत गणपतीच्या आगमनासह विसर्जनावेळी मिरवणूक काढण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे.

गणेश मंडळांनी मंडप लहान आकाराचे उभारेवत. त्याचसोबत देगणी, वर्गणी ही सुद्धा ऐच्छिक असावी. आरती, भजन, किर्तनावेळ नागरिकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याते नियमावलीत सांगण्यात आले आहे. जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी विसर्जनाच्या घाटावर येणे टाळावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.  विसर्जन करताना गर्दी होणार नाही याची सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.(Pune Unlock: उद्यापासून पुणे अनलॉक! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती; कशा-कशातून मिळाली सूट? घ्या जाणून)

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गणेशोत्सवाबद्दल विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले की, यंदाच्या वर्षी सुद्धा गणेशोत्सवावर निर्बंध असणारच आहेत. गणपतीच्या काळात करोनाच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी अशा सूचनाही दिल्या गेल्या आहेत.