Pulwama Attack: जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा महत्वाचा दिवस मानला जातो. परंतु 14 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या इतिहासात 'काळा दिवस' म्हणून पाळला जातो. आजच पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी होमरजेनंतर ड्युटीवर परतणाऱ्या भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला, ज्यात मोठी जीवितहानी झाली होती. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेले वाहन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर आदळले होते, ज्यात झालेल्या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. पुलवामा हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण झाले आहे.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यात 78 बस ेस होत्या, ज्यात सुमारे 2500 जवान होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याने या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले होते. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात अचानक जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार ताफ्यातील एका बसवर आदळली. जोरदार स्फोट होऊन बसचे तुकडे झाले होते.
इतक्यावरच न थांबता दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हँडग्रेनेड आणि एके-56 ने सुनियोजित हल्ला केला. जखमींना रुग्णालयात पाठवल्यानंतर लष्कराच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती,