Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2025) साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात तसेच कोकणात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ज्या दिवशी गणपती बाप्पा पुन्हा जिवंत झाला तो दिवस माघ महिन्यातील माघ शुद्ध चतुर्थीचा होता. म्हणून, दरवर्षा हा दिवस माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. गणेश भक्त माघी गणेश जयंती अत्यंत उत्साहात साजरी करतात.
बाप्पाच्या भक्तांसाठी माघी गणेश जयंती खूपचं खास असते. या दिवशी ते आपल्या घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठी करून मोठ्या भक्तीभावाने प्रार्थना करतात. तसेच काही गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. या दिवशी ते आपल्या घरातील गणरायाच्या दर्शनासाठी आपल्या मित्र-परिवाराला घरी बोलावतात. तुम्ही देखील खालील Messages, Images द्वारे तुमच्या आप्तेष्टांना गणरायाच्या दर्शनाचे आमंत्रण देऊ शकता.
माघी गणेश जयंती निमित्त आमंत्रण पत्रिका -
ॐ श्री गणेशाय नम:॥
यंदा आमच्या घरी 1 फेब्रुवारी दिवशी गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्त होणार्या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री.... आणि सौ ... कडून आग्रहाचे निमंत्रण!
पत्ता -
तारीख -
वेळ -
llश्री गणेशाय नम:ll
सालाबादा प्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
पत्ता -
वेळ -
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींचं आगमन होणार आहे. तरीही आपण 1 फेब्रुवारी 2025 दिवशी सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घरी यावं ही विनंती.
वेळ- दुपारी: 12 वाजून 30 मिनिटं
आरतीची वेळ : संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं
विनित -
श्री गणेशाय नम:
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर हजेरी लावावी.
आपले लाडके,
पत्ता:
माघी गणेश उत्सवामध्ये यंदाही आमच्या घरी दरवर्षी प्रमाणे गणरायाचं आगमन होणार आहे. तरी बाप्पाच्या दर्शनासाठी 1 फेब्रुवारीला घरी येऊन तीर्थ प्रसादाचा आस्वाद घ्यावा.
पत्ता:
हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या वर्षी गणेश जयंती 1 फेब्रुवारी रोजी आहे. याला गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र गणेश यांची पूजा केली जाते.