
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 HD Images: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेतले की, प्रत्येकाला अभिमान वाटतो. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांनी मुघलांचा पराभव करून मराठा साम्राज्याचे उदात्तीकरण केले. 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचा मृत्यू झाला. शूर मराठा योद्धा राजा आणि रणांगणावरील त्यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 3 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024) साजरी केली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. आज देशभरात शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. लोक त्यांना सोशल मीडियावर आदरांजली अर्पण करत आहेत. तुम्ही देखील शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Messages द्वारे खालील ईमेज शेअर करून शिवरांयांच्या स्मृतीय अभिवादन करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी प्रणाम

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!

छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन!

छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

शिवाजी महाराजांचे शौर्य इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. त्यांच्या शौर्याचे उदाहरण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दिले जाते. 3 एप्रिल रोजी गंभीर आजारामुळे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.