Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wallpaper, Wishes, Images शेअर करत शंभूराजांना करा त्रिवार अभिवादन!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages (PC - File Image)

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti) सुपुत्र आणि मराठा शासकांचे शूर योद्धे छत्रपती संभाजी महाराज  (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. शिवाजी महाराजांचे पुत्र आणि त्यांचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 1681 रोजी औपचारिक राज्याभिषेक झाला. दरवर्षी 14 मे रोजी संभाजी महाराज जयंती संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागात साजरी केली जाते. संभाजी भोसले यांनी वयाच्या 2 व्या वर्षी त्यांची आई गमावली होती. त्यानंतर त्यांचे पालनपोषण जिजाबाईंनी केले. जिजाबाईंनी संभाजी भोसले यांना आध्यात्मिक तसेच क्षत्रिय धडे दिले.

संभाजी महाराजांनी गादी ग्रहण केली तेव्हा मराठ्यांचा त्यावेळचा सर्वात शक्तिशाली शत्रू मुघल सम्राट औरंगजेब होता. संभाजी महाराजांनी भारतातून विजापूर आणि गोलकोंडाची सत्ता संपुष्टात आणण्यात मोठा वाटा उचलला. संभाजी महाराज त्यांच्या शौर्यासाठी खूप प्रसिद्ध होते. संभाजी महाराजांची कारकीर्द 1680 ते 1689 पर्यंत होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही WhatsApp Status, Wallpaper, Wishes, Images शेअर करत शंभूराजांच्या स्मृतिस त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील मराठी शुभेच्छापत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता. (हेही वाचा - Mother's Day 2023 Date: यंदा 14 मे रोजी साजरा होणार 'मदर्स डे'; जाणून घ्या 'मातृदिना'चे महत्व व या दिवसाच्या सेलिब्रेशनचा इतिहास)

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,

श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराजांना,

त्रिवार मानाचा मुजरा…

सर्व शिवभक्तांना,

संभाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages (PC - File Image)

ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,

“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,

“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,

“जय संभाजी” बोलल्याने

आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages (PC - File Image)

पाहुनी शौर्य तुजपुढे

मृत्यूही नतमस्तक झाला

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभू अमर झाला

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages (PC - File Image)

श्रृंगार होता संस्काराचा

अंगार होता स्वराज्याचा

शत्रुही नतमस्तक होई जिथे

असा पुत्रआपल्या शिवबाचा

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages (PC - File Image)

धर्मशास्रपंडित, ज्ञानकोविंद

सर्जा, रणधुरंदर,

क्षत्रियकुलावतांस, सिंहासनधिश्वर

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 Messages (PC - File Image)

संभाजी महाराजांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत 210 युद्धे केली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे सैन्य एकाही लढाईत पराभूत झाले नाही. संभाजी महाराजांच्या शौर्याने त्रस्त होऊन औरंगजेबाने त्यांचा पराभव करण्याची शपथ घेतली. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली.