Akshaya Tritiya 2023 Messages: वैशाख शुक्ल पक्षाची तिसरी तिथी अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. यावेळी अक्षय्य तृतीया दोन दिवस साजरी होणार आहे. या दिवशी केलेले स्नान, दान, जप, तपश्चर्या आणि होम यांचा क्षय होत नाही, असे मानले जाते. या वेळी अक्षय्य तृतीयेला आयुष्मान योग, शुभ कृतिका नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, अमृत सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योगही पाहायला मिळतील. ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, तृतीया तिथी 22 एप्रिल रोजी सकाळी 8.04 ते 23 एप्रिल रोजी सकाळी 8.08 पर्यंत असेल. कृतिका नक्षत्र शनिवारी रात्री 11.24 पर्यंत राहील आणि त्यानंतर 23 एप्रिल रोजी 12.27 पर्यंत रोहिणी नक्षत्र राहील.
दुसरीकडे, 23 एप्रिल रोजी पहाटे 5.37 वाजता सूर्योदय होईल आणि तृतीया तिथी सकाळी 8.08 पर्यंत राहील. त्याचबरोबर 22 एप्रिलला म्हणजेच शनिवारी खरेदीसाठी संपूर्ण दिवस शुभ योगाचा लाभ लोकांना मिळणार आहे. हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला अत्यंत महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त Facebook, WhatsApp Status, HD Images, Quotes द्वारा तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2023 Digital Gold Offer: अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करताय? हे आहेत '5' ऑनलाईन पर्याय)
साडेतीन मुहूर्तांपैकी
एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया
या सणाच्या निमित्ताने
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या या शुभ दिवशी
भगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व
तुमच्या कुटुंबावर राहो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण हाती घेतलेले काम सदैव पूर्ण होवो
आपले कोणतेच काम अपूर्ण न राहो
आपली सर्व स्वप्न पूर्ण होवो
आपल्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहो
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी
यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो
आपल्याकडे अक्षय आरोग्य आणि धन विराजमान हो
अक्षय तृतीया सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपल्यावरील संकटांचा नाश होऊन
आपल्या कुटुंबावर सदैव धन बरसात होवो
तुम्ही सदैव खुशीचे गीत गावो
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !
वैशाख शुक्ल तृतीया दोन दिवस असेल. अक्षय्य तृतीयेला स्नान करून देवता आणि पितरांची पूजा केल्यानंतर उन्हाळ्यात उपयुक्त वस्तूंचे दान करावे. गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे अक्षय्य तृतीयेलाच उघडतात. भविष्य पुराणानुसार या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचे वंशज आणि ब्रह्मदेवाचे पुत्र अक्षय कुमार यांचेही दर्शन याच दिवशी झाले.