Jewellery (Photo Credits: Pixabay)

अक्षय्य तृतीयेचा शुभ सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो. अक्षय्य तृतीयेपासून शुभ कार्याची सुरुवात केली जाते किंवा सोने खरेदी करणे ही शुभ मानले जाते. यंदा कोरोनाचा कहर काहीसा शांत झालं असलं तरी  अक्षय्य तृतीया म्हंटल की सोन्याची खरेदी आलीच त्यामुळे दुकानात पाय ठेवायलाही जागा नसणार अशा वेळी तुम्ही घरात बसून हवं ते खरेदी करू शकता, सध्या अनेक जणांनी त्यांचे अॅप सुरु केले आहेत. अपच्या माध्यामतून तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता. दरम्यान, आम्ही काही अॅपचे नाव घेऊन आलो आहोत, खालील यादी पाहून तुम्ही हव ते घेऊ शकता.

जाणून घ्या अधिक माहिती

कल्याण ज्वेलर्स

ज्वेलरी विक्रेता कंपनी कल्याण ज्वेलर्सने ऑनलाइन विक्री कोरोना काळात सुरु केली आहे. ग्राहक दोन ग्रॅमपेक्षा जास्त सोने खरेदी करू शकतात, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुवर्ण मालकी प्रमाणपत्र त्यांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांनी सूचित केलेल्या ठिकाणी पाठवले जाईल.

सेन्को गोल्ड आणि डायमंड्स

Senco Gold & Diamonds सोन्याच्या दरावर सूट देत आहे. 22 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या ऑफरमध्ये कंपनी 400 रुपये प्रति ग्रॅम सूट देत आहे.

डिजिटल गोल्ड

डिजिटल गोल्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करता येते. तसंच हे सोने तुम्ही सुरक्षितरित्या स्टोअर करु शकता.

सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड SGB

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड हा देखील एक पर्याय आहे. हा बॉन्ड सरकारकडून जारी करण्यात येतो. सोन्यातील दीर्घ कालीन गुंतवणूकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. 

तनिष्क

टाटा समूहाच्या ज्वेलरी ब्रँड तनिष्क अक्षय्य तृतीयेला ऑनलाइन विक्रीवर लक्ष केंद्रित करणार आहेत. www.tanishq.co.in या वेबसाइटला भेट देऊन ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात.