New Year 2020 Celebration Ideas: घरच्या घरी नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करण्यासाठी या '5' आयडियाज येतील कामी
New Year Celebration (Photo Credits: Instagram)

न्यू ईयर म्हटलं की सेलिब्रेशन आलच. मात्र हे सेलिब्रेशन कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडला असतो. New Year सेलिब्रेशन हे जरी मद्यपान आणि धांगडधिंगा करण्याचा विषय असला तरीही अनेकांना घरी राहणे आणि कुटूंबासोबत 31st सेलिब्रेट करायलाही आवडते. काहींना आउटिंगला जाणे आवडते, काहींना देवदर्शन तर काही लोकांना पिकनिकला जाणे. प्रत्येकाच्या न्यी ईयर सेलिब्रेशन करण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. मात्र त्या करण्यासाठी त्याचे आतापासून प्लान्स सुरु झाले असतील. ज्या लोकांना बाहेरच्या गलबलाटापेक्षा घरात आपल्या कुटूंबासोबत अथवा मित्रपरिवारासोबत सेलिब्रेशन करणे आवडते अशा लोकांना घरी नेमके काय करता येईल हे आम्ही आज सांगणार आहोत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरच्या घरी न्यू ईयर सेलिब्रेशन करायचे असेल तर ड्रेसिंगची गरज नसते. पण तुम्हाल छान फोटो सेशन करायचे असेल तर तुम्ही आपापसात ठरवून छान ड्रेसिंग करु शकता. पाहूयात अजून काय काय गोष्टी घरात करता येतील.

1. हाऊस पार्टी

नवीन वर्षासाठी तुम्ही घरच्या घरी हाऊस पार्टीचे आयोजन करु शकता. यात तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा खास मित्रांना बोलावू शकता. तसेच घरी छान केक बनवू डिनरचे आयोजन करु शकता. मॉकटेल्स आणि कॉकटेल्सचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला जेवण बनवायचे नसेल तर तुम्ही बाहेरून ऑर्डरही करु शकता.

हेदेखील वाचा- New Year 2020: नववर्षात कोणते संकल्प करु शकता; पाहा काही भन्नाट आयडियाज

2. कुटूंबासह खास प्लान

इतर दिवशी कामात व्यस्त असलेल्या आपल्या कुटूंबातील सदस्यांना एकत्र जमवून थर्टी फर्स्ट चे सेलिब्रेशन करु शकता.

3. पिज्जा आणि केक

जर तुम्हाला नेहमीच्या जेवणाच्या कंटाळा आला असेल तर घरी पिज्जा आणि केक ऑर्डर करु शकता.

4. खमंग पदार्थांचा मेजवानी

यात तुम्ही घरच्या घरी खमंग, चमचमीत प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे पदार्थ बनवू शकता अथवा ऑर्डर करु शकता.

5. घरगुती खेळ

घरच्या घरी तुम्ही हौजी आणि अनेक घरगुती खेळ खेळू शकता. यातही तुम्हीला खूप मजा येईल.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन हे घराबाहेरच केलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला पाहिजे तसे, हवं तसं तुम्ही न्यू ईयरच सेलिब्रेशन करु शकता. शेवटी तुमचा आनंद महत्त्वाचा. नाही का?