नवरात्रोत्सव 2018 :IRCTC ची खास 'नवरात्री स्पेशल थाळी', प्रवासादरम्यान चाखता येणार लज्जतदार उपवासाच्या पदार्थांची चव !
IRCTC ई कॅटरिंग मेन्यू (Photo Credit: Twitter)

नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही जण नऊ दिवस तर काही जण केवळ घट बसताना आणि उठवताना उपवास करतात. या दिवसातील उपवासात अनेकजण केवळ फलाहार किंवा ठराविक पदार्थ खातात. त्यामुळे लांब प्रवासात हे उपवास पाळणं कठीण होऊन जाते. पण तुम्ही नवरात्रीमध्ये भारतीय रेल्वेने प्रवास करणार असाल तर उपवासाच्या पदार्थांचं टेन्शन आता दूर होणार आहे. कारण रेल्वेतच उपवासाच्या खास पदार्थांची सोय होणार आहे.

नुकत्याच रेल्वेने प्रवासादरम्यान खास उपवासाचे मिळणार असल्याचं सांगितलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 10-18 ऑक्टोबर या नवरात्रीच्या उपवासाच्या दिवसांमध्ये साबुदाणा, सत्तूचं पीठ, सैंधव मीठ यापासून बनवलेले पदार्थ उपलब्ध केले जाणार आहेत.

रेल्वेच्या ई कॅटरिंग मेन्यूमध्ये आता 'व्रत का खाना' हा पर्याय उपलब्ध होणार आहे. काही विशिष्ट हॉटेल्समधून हे पदार्थ प्रवाशांना उपलब्ध करून दिले जातील.

 

कुठे पहायला मिळतील पदार्थ ?

www.ecatering.irctc.co.in किंवा 'Food-on-track' app या रेल्वेच्या ई कॅटरिंग पर्यायांमध्ये प्रवासी साबुदाणा खिचडी, लस्सी, फ्रुट चॅट, नवरात्री थाली अशा पदार्थांचं पी ऑर्डर बुकिंग करणार आहेत.

ट्रेन सुटण्यापूर्वी किमान 2 तास आधी तुम्ही खाद्यपदार्थांची ऑर्डर देऊ शकता.

पैसे देण्याची सोय ऑर्डरच्या वेळेस आणि पदार्थ डिलिव्हर झाल्यानंतर अशा दोन्ही स्वरूपात दिले जाऊ शकतात.

कोणकोणत्या स्टेशनवर मिळणार सोय ? 

नागपुर, अंबाला, जयपुर, इटारसी, झांसी, नाशिक, रतलाम, दौंड, मथुरा, निजामुद्दीन, लखनऊ या स्टेशवरच नवरात्री विशेष थाळी आणि उपवासाच्या पदार्थंची सोय करून दिली जाणार आहे.