नवरात्रोत्सव 2018 : मुंबईत दुर्गापूजा पाहण्यासाठी या '5' मंडळांना अवश्य भेट द्या !
दुर्गापूजा Photo Credit : Instagram

महाराष्ट्रभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पश्चिम बंगाल भागात षष्ठीपासून पुढील पाच दिवस दुर्गापूजा साजरी केली जाते. काली मातेच्या पूजेचा हा सण मुंबईतही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सार्वजनिक स्वरूपात मोठमोठ्या मंडळांतर्फे दुर्गापुजा, सिंदुर खेल अशा पारंपारिक पद्धतीमध्ये सण साजरा होतो. सणाच्या सोबतीने तुम्हांला अस्सल बंगाली पदार्थांची चवही चाखायची असेल तर मुंबईतील काही मंडळांना अवश्य भेट द्यायला विसरू नका.

मुंबईतील दुर्गापूजा

1. बंगाल क्लब,शिवाजी पार्क

मुंबईचं हार्ट समजल्या जाणार्‍या दादर परिसरात बंगाल क्लबतर्फे मोठ्या उत्साहात दुर्गापूजा केली जाते. मुंबईत दुर्गा पूजेचे आयोजन करणारे हे मंडळ सर्वात जुने दुसरे मंडळ आहे. यंदा बंगाल क्लबचं 82 वं वर्ष आहे. पाच दिवसांच्या पारंपारिक पद्धतीने दुर्गात्सवासोबतच येथे भाविकांना शॉपिंग आणि पारंपारिक पदार्थांची चव चाखाण्याचा आनंद लूटता येतो.

कुठे आहे ? शिवाजी पार्क, महापौर बंगल्यासमोर -दादर

2. बॉम्बे दुर्गा बरी समिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Bombay Durga Bari Samiti (@bombaydurgabarisamiti) on

बॉम्बे दुर्गा बरी समिती ही मुंबईत दुर्गापूजेचे आयोजन करणारी सगळ्यात जुन्या समितींपैकी एक आहे. यंदा या समितीचे 88 वे वर्ष आहे. 'मेळा' या थीमवर आधारित दुर्गा पूजेचे आयोजन आणि सजावट करण्यात आली आहे.

कुठे आहे ? तेजपाल हॉल अ‍ॅन्ड ऑडिटेरियम ग्रॅन्ड रोड

3.रामकृष्ण मठ आणि मिशन पूजा

 

View this post on Instagram

 

Yes, yes. I didn't just take food pictures 2. Khar Ramkrishna Mission #DurgaPujo #mumbai

A post shared by Kalyan Karmakar (@thefinelychopped) on

अस्सल पारंपारिक पद्धतीने मुंबईत दुर्गापूजा साजरी करण्यासाठी रामकृष्ण मठातील दुर्गापूजा लोकप्रिय आहे. येथे कुमारी पूजनही केले जाते. स्वामी विवेकानंदांनी कुमारिका पुजनाची सुरूवात केली.

कुठे आहे ? रामकृष्ण मिशन मार्ग,12 वा रस्ता खार पश्चिम

4. चेंबूर दुर्गा पूजा असोसिएशन

यंदा चेंबूर दुर्गा पूजा असोसिएशनचे 64 वे वर्ष आहे. दरवर्षी 2 लाखाहून अधिक लोकं या मंडळाला भेट देतात. पारंपारिक भोग, अस्सल पारंपारिक पदार्थांची लयलूट असते. यंदा येथे अर्पिता आणि आयन या बंगाली कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत.

कुठे आहे ? चेंबूर हायस्कूल ग्राऊंड, स्वामी विवेकानंद चौक, चेंबूर पूर्व

5. नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा

नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा या मंडळाला अनेक सेलिब्रिटींचीही हमखास हजेरी असते. 1947 साली पद्मश्री शासधर मुखर्जींनी 26 मित्रमंडळींसोबता एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली.मुंबईतील ही सर्वात मोठी इको फ्रेंडली मूर्ती आहे.

कुठे आहे ? गोल्डन टोबॅको ग्राऊंड, टोबॅको हाऊस, इंदिरा नगर, एस.व्ही रोड, विलेपार्ले