National Girl Child Day 2019: भारतामध्ये 'राष्ट्रीय बालिका दिवस' साजरा करण्याची सुरूवात कशी आणि कधी झाली?
राष्ट्रीय बालिका दिवस 2019 (Photo Credits: Facebook)

National Girl Child Day 2019: भारतामध्ये 24 जानेवरी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) म्हणून साजारा केला जातो. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे. समाजाच्या या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 11 ऑक्टोबर हा दिवस International Girl Child Day म्हणून साजरा केला जात असला तरीही भारतामध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून 2008 साली दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा करण्यात आली होती. 21-26 जानेवारी दरम्यान 'Empowering Girls for a Better Tomorrow'या थीम अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यामागील उद्देश काय ?

समजातील मुलगा - मुलगी हा भेद कमी करणं

प्रत्येक मुलीला समाजात तिचा सन्मान आणि हक्क मिळवा यासाठी प्रयत्न

प्रत्येक मुलीला तिचे मानवी हक्क मिळणं

मुलींना त्यांचं आरोग्य, शिक्षण, सन्मान आणि पोषक वातावरण आणि आहार मिळवण्यासाठी आवश्यक घटकांचा गांभीर्याने विचार करणं

आत्मरक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जागृत करणं

यंदा राष्ट्रीय बालिका दिन आणि बेटी बचाव बेटी बढाव या मोहीमेची चौथी वर्षपूर्ती एकाच दिवशी आल्याने सेलिब्रेशन द्विगुणित होणार आहे. आज सोशल मीडीयाच्या माध्यामातूनही अनेकांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देत समाजात मुलगी-मुलगी हा भेद बाजूला सारून पुढे येण्याचं आणि मुलींना समान अधिकार देण्यासाठी आवाहन केलं आहे.