Narad Jayanti 2024 Wishes : हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी नारद जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये, नारद मुनींचे सर्व देवी-देवतांचे आवडते ऋषी म्हणून वर्णन केले आहे. वीणा धारण करणारे नारद मुनी आपल्या ज्ञान, भक्ती आणि संगीत कलेसाठी संपूर्ण विश्वात लोकप्रिय आहेत. नारद जयंतीनिमित्त भाविक नारद मुनींची पूजा करतात आणि भजन-कीर्तन करतात. असे मानले जाते की संगीत आणि कला क्षेत्राशी संबंधित लोक नारद जयंती मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरी करतात. यानिमित्ताने नारद मुनींशी संबंधित धार्मिक ग्रंथ, प्रार्थना, उपदेश, कथांचे पठण केले जाते. ज्याचा उल्लेख अनेक हिंदू महाकाव्यांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. यावर्षी २५ मे रोजी नारद जयंती साजरी केली जाणार आहे. दरम्यान, नारद जयंती आणखी उत्साहात साजरी करता यावी म्हणून आम्ही काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, चला तर पाहूया
नारद जयंती निमित पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश:
ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान व ध्यान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी नारद मुनींचे ध्यान करा आणि भगवान विष्णूची पूजा करा, कारण नारद मुनी देखील भगवान विष्णूचे निस्सीम भक्त होते. भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर धूप आणि दिवा लावा आणि मनोभावे पूजा करा.