Nag Panchami 2020 Jokes (Photo Credit : Pixabay)

Nag Panchami 2020 Marathi Jokes: आज नागपंचमीचा सण देशातील विविध भागांत साजरा केला जाईल. तर महाराष्ट्रात या सणाचे वेगळेच महत्त्व आहे. श्रावणातील या पहिल्या सणाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना सोशल मीडिया नागपंचमी निमित्त खास जोक्सही व्हायरल होत आहे. नागपंचमी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मजेशीर जोक्सची चलती आहे. साणाचे गुणधर्म असणाऱ्या लोकांसाठी हे जोक्स चपलखपणे बसत असून यामुळे काही क्षण चेहऱ्यावर हास्य जरुर उमटेल. नागाचे गुणधर्म म्हणजे फणा काढणे, नागिण डान्स करणे, पुंगीच्या आवाजावर डोलणे इत्यादी. तर तुमच्या मित्र मंडळी किंवा कुटुंबातील कोणामध्ये हे गुण असतील तर तुम्ही हे विनोद पाठवून नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ शकता.

नागपंचमी निमित्त आपले कुटुंबिय, मित्र मंडळी यांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास मराठी जोक्स, विनोद, Funny Messages आणि Wishes. हे विनोद तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅपस, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमातून शेअर करुन नागपंचमीच्या हटके शुभेच्छा द्या. (Nag Panchami 2020 Messages: नागपंचमी सणानिमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes शेअर करुन साजरा करा श्रावणातील पहिलावहिला सण!)

नागपंचमी मराठी विनोद!

  • लग्नात, वरातीत, गणपतीत

    नागीण डान्स करणाऱ्या

    समस्त विषारी-बिनविषारी

    मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा!

  • नागाप्रमाणे सतत फणा काढणाऱ्या

    माझ्या मित्रमंडळींना

    नागपंचमीच्या शुभेच्छा!

  • बायकोच्या नुसत्या आवाजावर

    डुलणाऱ्या 'त्या' प्रत्येक नागोबाला

    'नागपंचमी'च्या भरभरुन शुभेच्छा!

  • माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या

    सर्व मानवरुपी नागांना

    नागपंचमीच्या शुभेच्छा!

  • पिकनिकचे प्लॅन्स शेवटच्या क्षणी

    कॅन्सल करणाऱ्या पटलीमारु

    'सापांना'

    नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या संस्कृतीत सर्व उपयुक्त गोष्टींची पूजा करण्याची परंपरा आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीचे नुकसान करणारे उंदीर खावून साप हा शेतकऱ्यांची मदत करत असतो. त्यामुळे साप, नागाच्या पूजेची प्रथा आपल्याकडे सुरु झाली असावी. तसंच पर्यावरण संवर्धासाठी नागांचे जतन करणे आवश्यक आहे.