
जगामध्ये मे महिन्यातील दुसरा रविवार हा 'मदर्स डे' (Mother's Day) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे यंदा 14 मे दिवशी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. आई शिवाय कोणाचेही अस्तित्त्व अपूर्ण आहे. आई आणि तिच्या मुलांचं नातं हे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं असते. काहींसाठी आई म्हणजे दरारा असतो तर काहींसाठी त्यांच्या आयुष्यातील वीक पॉईंट. पण आईशिवाय अस्तित्त्व अपूर्ण आहे. मग तुमच्या आयुष्यात खास असणार्या या व्यक्तीचा आजचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Facebook Messages, WhatsApp Status, HD Images, Greetings शेअर करून हा दिवस खास करा.
मदर्स डे ची सुरुवात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे झाली. अॅना जार्विस यांच्या आईने मैत्री आणि नातेसंबंध वाढवण्यासाठी महिलांचा एक ग्रुप तयार केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर 12 मे 1907 रोजी त्यांच्या स्मरणार्थ निमित्त तेथील चर्चमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कालांतराने अमेरिकेतील बहुतांश राज्यामध्ये हा दिवस आईसाठी सेलिब्रेट केला जाऊ लागला. या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या आईला शुभेच्छा, गिफ्ट्स देत असे. ही परंपरा अमेरिकेबाहेरही पसरु लागली आणि मदर्स डे सर्वत्र साजरा होण्यास सुरूवात झाली आहे. नक्की वाचा: मदर्स डे आणि मातृ सुरक्षा दिवसात काय आहे फरक? जाणून घ्या.
मदर्स डे 2023 च्या शुभेच्छा

व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व
मातृदिन शुभेच्छा..

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,
म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई
हॅप्पी मदर्स डे 2023

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
मदर्स डे 2023 च्या जगातील सार्या 'आईं'ना
मनापासून शुभेच्छा!
हॅप्पी मदर्स डे

तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!
मदर्स डेच्या शुभेच्छा!

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आईचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. त्यामुळेचं मदर्स डे साजरा करा. यानिमित्त आईला गिफ्ट देऊन तिच्यासोबत आजचा दिवस साजरा करून तिच्यासाठी हा दिवस थोडा स्पेशल करा.