
Happy Mothers Day Messages in Marathi: प्रत्येकाच्या आयुष्यात आई अत्यंत महत्त्वाची असते. तिच्याशिवाय आपले पानच हलत नाही. आपल्या आयुष्यातील तिचे स्थान अद्याप अबाधित आहे हे दाखवून देण्यासाठी एक खास दिवस सेलिब्रेट केला जातो. तो म्हणजे 'मदर्स डे'. मदर्स डे म्हणजेच मातृदिन जगभरातील विविध देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा 9 मे रोजी मातृदिन साजरा केला जाईल. मदर्स डे ची सुरुवात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे झाली. अॅना जार्विस यांच्या आईने मैत्री आणि नातेसंबंध वाढवण्यासाठी महिलांचा एक ग्रुप तयार केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर 12 मे 1907 रोजी त्यांच्या स्मरणार्थ निमित्त तेथील चर्चमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कालांतराने अमेरिकेतील बहुतांश राज्यामध्ये हा दिवस आईसाठी सेलिब्रेट केला जाऊ लागला. या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या आईला शुभेच्छा, गिफ्ट्स देत असे. ही परंपरा अमेरिकेबाहेरही पसरु लागली आणि मदर्स डे सर्वत्र साजरा होऊ लागला.
मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes आणि Greetings तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन तुमच्या आईचा दिवस गोड करा.
मातृदिनाच्या शुभेच्छा!
देवा जिने जन्म देऊन घडविलं मला
सदैव सुखी ठेव माझ्या माऊलीला
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई म्हणजे मंदीराचा उंच कळस
अंगणातील पवित्र तुळस
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आणी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

हॅप्पी मदर्स डे!

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या मातृदिनाच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. मदर्स डे च्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Mother’s Day Stickers टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या आईला पाठवा.
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, हे अगदी खरंय. तिनेच जन्म दिला. संस्कार केले. संगोपन केले. प्रसंगी माया, प्रेम, राग, धाक सर्व काही देत वाढवलं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास दिला, प्रेरणा दिली, बळ दिलं. तर कधी दु:खावर हळूवार फुंकरही घातली. त्यामुळे प्रत्येकासाठी त्याची आई हे त्याचे विश्व असते. त्यामुळे मातृदिनानिमित्त छानसा मेसेज शेअर करुन तिचा दिवस गोड करायला विसरु नका. मदर्स डे निमित्त जगातील प्रत्येक आईला सलाम करुया! हॅप्पी मदर्स डे!