Margashirsha Guruvar Udyapan Vidhi: मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करण्याचा विधी काय?
Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi (Photo Credits: Youtube)

Last Margashirsha Guruvar 2019: मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरूवार आज (19 डिसेंबर) साजरा केला जाणार आहे. दरम्यान आजच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरूवार असल्याने सवाष्ण महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या रूपातील स्त्रीचा आदर राखतात. दरम्यान महालक्ष्मीची घरात घटाच्या स्वरूपात मांडणी केली जाते. त्यामुळे तुमच्या घरीदेखील यंदा महालक्ष्मी, वैभवलक्ष्मीची पूजा बांधली असेल तर त्याचं उद्यापन करण्याची देखील विशिष्ट पद्धत आहे. घटाची मांडणी जशी विशिष्ट विधी, पूजेच्या स्वरूपात केली जाते तसेच त्याचे विसर्जन करण्याचाही विधी आहे. मग जाणून महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं केलं जाते? Margashirsha Gurvar 2019: मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरूवार यंदा 19 डिसेंबरला; पहा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ते मसाले दूध कशी कराल तयारी?

महालक्ष्मीव्रत उद्यापनाचे विधी काय?

  • संध्याकाळी महिलांना, कन्यांना फळं देण्याची पद्धत आहे. दरम्यान या महिला लक्ष्मीच्या स्वरूपात तुमच्या घरात येतात त्यामुळे त्यांना जमिनीवरा बसवू नये. त्यांना असनावर बसवून त्यांना हळदी कूंकू द्या .
  • प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीच्या घटाची पूजा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी आंघोळ करून देवीला नमस्कार करून घरात शांतता, आनंद रहावा याची प्रार्थना करा.
  • त्यानंतर घटावरील नारळ हलवा. दरम्यान गजरा, वेणी, फुलं केसांमध्ये माळावा.
  • दुर्वा, निर्माल्य, नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकाता. किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता.
  • सुपारी, नारळ तुम्ही आहारात वापरू शकता. मात्र कापड किंवा साडी असल्यास ती गरजवंताला दान करू शकता. काही जण नारळ लाल कपडामध्ये बांधून ठेवू शकता.
  • कलशामधील पाणी तुम्ही तुळशी वृंदावनामध्ये ओतू शकता.
  • हळदी कुंकू देवासाठी न वापरता थेट व्यक्तिगत वापरासाठी उपयोगामध्ये आणू शकता.

महालक्ष्मी व्रता दिवशी संध्याकाळी महिलांच्या, कन्या पूजेला विशेष महत्त्व असते. त्यामुळे घरी येणार्‍या महिलांना मसाले दूध किंवा एखादा उपवासाचा पदार्थ देऊन त्यांचं आदरातिथ्य करावं.