![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/12/Untitled-design-2019-12-18T170237.687-380x214.jpg)
श्रावणाइतकाच महत्त्वाचा आणि पवित्र हिंदू महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची प्रथा आहे. यंदा 19 डिसेंबर 2019 दिवशी या वर्षीचा शेवटचा गुरूवार साजरा केला जाणार आहे. महालक्ष्मी, वैभवलक्ष्मी च्या व्रतासोबत या दिवशी काही जण केवळ उपवास ठेवून हे व्रत करतात. मात्र या महालक्ष्मी व्रताच्या शेवटच्या दिवशी सवाष्ण महिला हळदी कुंकवाचा खास कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच मसाले दूध बनवण्याची पद्धत आहे. मग तुमच्या घरी देखील उद्या शेवटच्या गुरूवारचं औचित्य साधून खास तयारी सुरू असेल तर पहा उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा कराल?
महालक्ष्मी हे व्रत घरामध्ये सुख, शांती, आनंद नांदावा म्हणून केलं जातं. त्यामुळे लक्ष्मीच्या स्वरूपात सवाष्ण स्त्रीला हळदी - कुंकू देऊन तिचा आदर राखला जातो. सोबत फुलं, एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. यामध्ये महालक्ष्मी व्रताचं पुस्तक ते एखादी गृहउपयोगी वस्तू, फळ, नारळ भेटवस्तूच्या स्वरुपात दिली जाते. यासोबत फुल, गजरा देण्याची प्रथा आहे. यासोबतच उपवास असल्याने संध्याकाळी मसाले दूध बनवण्याची पद्धत आहे. Margashirsha Guruvar Vrat 2019: मार्गशीर्ष व्रताच्या पूजेला बसण्याआधी महिलांनी चुकूनही करु नका ही '5' कामे.
मसाला दूध कसं बनावाल?
मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरूवारी घरामध्ये घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पुजा केली जाते. तर शुक्रवारी सकाळी या घटाचे उद्यापन केले जाते. सकाळी घटाची मांडणी केल्यानंतर सकाळ - संध्याकाळ पूजा केली जाते. तसेच गोडाचा पदार्थ बनवून नैवेद्याच्या स्वरूपात दाखवून दिवसभराचा उपवास सोडला जातो.