Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी म्हणजे 'शयनी एकादशी' होय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. हा सण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. या दिवशी भाविक श्रध्देनुसार, उपवास करतात. भगवान विष्णू आणि विठ्ठलाची उपासना करून लोक भक्तीभावाने उपवास करतात. या वर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आली. आषाढी एकादशीला उपवास केल्याने पापक्षय होतो अशी श्रध्दा आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी वारीचा उत्सव साजरा केला जातो. (हेही वाचा- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात माळीनगर मध्ये पार पडला उभं रिंगण सोहळा)
उपवास केल्याने आरोग्यालाही फायदा होत असतो. उपवासाच्या दिवशी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात जे पचायला सोपे असतात आणि पोषणमूल्येही भरपूर असतात. आषाढी एकादशी निमित्त उपवासाला खाण्यासाठी 'हे' पौष्टिक पदार्थ नक्की बनवा.
१. साबुदाना खिचडी- साबुदान, शेंगदाणा, मिरची आणि मीठ घालून बनवलेली ही खिचडी उपवासात खायला चवष्टी आणि पौष्टीक असते.
२. शिंगाड्याचा शिरा- शिंगाड्याचा पिठ, सुखामेवा, तूप, गुळ यांनी बनवलेला शिरा हा सर्वात जास्त पोष्टीक असतो. त्याचबरोबर शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवून त्याचे सेवन करू शकता.
३. मखानाचे खिर- मखाणा, तुप, गुळ किंवा साखर आणि दुधाने बनवलेली ही खीर स्वादिष्ट बनते. मखानामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचन्यासाठी हलके असते.
४. राजगिरा शिरा किंवा लाडू- उपवासासाठी राजगिरा हा उत्तम पर्याय आहे. राजगिरा शिरा बनवण्यासाठी राजगिऱ्याची पिठ, साखर, तुप आणि सुखामेवाने बनवला जातो.
५. भगर भात आणि शेंगदाण्याची चटणी- भगर भात आणि शेंगदाण्याची चटणी हे उपवासाला खाल्ला जाणारा सर्वात जास्त पदार्थ आहे. भगरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
आषाढी एकादशी ही वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि विशेष असते. उपवासामुळे शरिराला विश्रांती मिळते आणि आरोग्यदायी फायदाही होत असतो. त्यामुळए हा दिवस भक्तांसाठी पवित्र मानला जातो.