
जैन धर्मीयांच्या प्रमुख सणांपैकी एक दिवस म्हणजे महावीर जयंती (Mahavir Jayanti). यंदा महावीर जयंती 10 एप्रिल दिवशी साजरी केली जानार आहे. जैन धर्मीयांच्या मान्यतेनुसार महावीरांचा जन्मदिवस चैत्र शुद्ध त्रयोदशी दिवशी झाला आहे. त्यामुळे जैन धर्मीय या दिवसाचं औचित्य साधत महावीरांप्रती आपली आदरांजली अर्पण करतात. मग यंदा तुम्हीही तुमच्या जैन मित्रमंडळींना, नातेवाईकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
महावीर हे जैन धर्मीयांचे 24 वे आणि अंतिम तीर्थकार होते. या दिवशी भगवान महावीरांना सोन्या-चांदीच्या भांड्यांनी अभिषेक केला जातो. जैन मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि विधी असतात. महावीर जयंती का साजरी केली जाते? जैन संप्रदयाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीरांविषयी 'या' रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा





भगवान महावीर यांना "वर्धमान" म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या आईचे नाव महाराणी त्रिशाला आणि वडिलांचे नाव महावीर महाराज सिद्धार्थ होते. महावीर स्वामींनी वयाच्या 30 व्या वर्षी ज्ञानाच्या शोधात घर सोडले. त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि दीक्षा घेतली. भगवान महावीरांनी तपश्चर्येनंतर कैवल्य ज्ञान प्राप्त केले आणि त्यानंतर त्यांना लोक तीर्थंकर म्हणू लागले. महावीर जयंती च्या निमित्ताने जैन मंदिरे विशेषतः सजवली जातात. भारतात अनेक ठिकाणी जैन समुदायाकडून अहिंसा रॅली आयोजित केल्या जातात. या प्रसंगी गरीब आणि गरजूंना देणगी दिली जाते.