
Mahatma Jyotiba Phule Jayanti 2023 Quotes: 11 एप्रिल म्हणजे आज ज्योतिबा फुले यांची जयंती आहे.परोपकारी, लेखक, तत्वज्ञ आणि क्रांतिकारक म्हणून ज्योतिबा फुले ओळखले जातात. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीभेद, लिंगभेद, जात याविरुद्ध मोठी लढाई लढविली. समानतेच्या मूल्यांवर आधारित जनजागृती केली. अनेकांना शिक्षित केले. ज्योतिबांच्या जयंतीनिमित्त आज पुन्हा एकदा त्यांचे हे विचार अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त करतील आणि प्रेरणा देतील.
पाहा, ज्योतिबा फुले यांचे अमूल्य विचार





क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले यांचे विचार समाज नेमका कसा असावा याबद्दलची शिकवण देतील, थोरांना आपण जयंती निमित्त पुजतो परंतु त्यांच्या विचारांचा आपल्याला विसर पडत चालला असे दिसून येते.