
Maharshi Dayanand Saraswati Jayanti 2023: आर्य समाजाचे संस्थापक, आधुनिक भारताचे महान विचारवंत आणि समाजसुधारक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती 15 तारखेला आहे. स्वामी दयानंद सरस्वती हे महान देशभक्त, समाजसुधारक आणि विचारवंत होते. स्वामी दयानंद सरस्वती हे एकोणीसाव्या शतकातली एक महान युगपुरूष, धर्मसुधारक आणि समाजसुधारक होते. दिशा हरवून बसलेल्या समाजाला आधार देण्याचं काम स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरातमधील टंकारा या गावी 12 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी रोजी झाला होता. तथापि, हिंदू कॅलेंडरनुसार, महर्षी दयानंद यांचा जन्म फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला झाला होता, त्यानुसार त्यांची जयंती यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त Wishes, Images, Whatsapp Status, Greetings द्वारे तुम्ही समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता.
पाहा पोस्ट,




आर्य समाजाचे संस्थापक, आधुनिक भारताचे महान विचारवंत आणि समाजसुधारक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरी करू शकता, वर दिलेले संदेश तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता.