महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून यात एकूण 12 पोलीस आयुक्तालयांसह 34 जिल्हा पोलीसदलांचा समावेश आहे. महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. तर महाराष्ट्र पोलिसांचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आहे, ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील जनतेच्या सुरक्षेचा विडा उचलेल्या महाराष्ट्र पोलिस दलाचा दरवर्षी २ जानेवारी रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. तरी अहोरात्र आपल्या प्राणाची बाजी लावत राज्यातील जनतेचं संरक्षण करणाऱ्या पोलिस दलाला शुभेच्छा देण्यासठी आम्ही काही डिजीटल शुभेच्छापत्र घेवून आलो आहोत जी तुम्ही तुमच्या पोलिस दलात नोकरीस असणाऱ्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पाठवू शकता.
जनतेच्या रक्षणासाठी,
महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!