
आज महाराष्ट्राचा 33 वा कृषी दिन(. राज्यात 1 जुलैला कृषी दिन साजरा करण्यात येतो. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्यात येते. वसंतराव नाईक यांचं कृषी क्षेत्रात मोठं योगदान असुन राज्यातील हरित क्रांतीचे जनक अशी त्यांची ख्याती आहे.
सन 1989 पासून 1 जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषी दिन साजरा केला जातो. देशभरातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. विविध उपक्रमातून केवळ आजचा 1 दिवस नाही तर 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो, पोशिंद्याला विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. सोशल मिडीयाच्या या नव्या युगात बळीराजाला नव्या पिठीने Whats App, Facebook, Instagram, Twitter अशा वेगवेगळ्या माध्यमातून कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज कृषी दिनाचे Video, Reels, Post आज Social Media वर जोरदार Trend होताना दिसत आहेत. ( हे ही वाचा, Maharashtra Krishi Din 2022 HD Images: महाराष्ट्र कृषी दिन निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Whatsapp Status; वसंतराव नाईक यांची जयंती करा उत्साहात साजर)
इडा पीडा टळो आणि बळी राजाचे राज्य येवो
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अस्मानी सुलतानी संकटे
झेलीत विश्वाचे पोट भरणाऱ्या बळीराजाला
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

'शेतकरी जगला तर तुम्ही, आम्ही आणि देश जगेल''
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतात घाम गाळून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

घाम गाळून काळ्या मातीत पिकवतो
मोती जगाचा पोशिंदा स्वत:ला म्हणवितो
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. वसंतराव नाईकांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं आणि कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली. आज महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं. गेल्या 33 वर्षात महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याचं बघायला मिळते. कापुस, गहू, ऊस उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात नवनव्या पद्धतीने शेती केल्याचं बघायला मिळते.