
मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. यंदा 66 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) साजरा केला जात आहे. बॉम्बे प्रेसिडंसी मधून 1 मे 1960 दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. मग यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही खास मराठमोळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स, WhatsApp Status, Facebook Messages, Photos सोशल मीडीयात शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणार्या साठी प्राणांची आहुती देणार्या 107 हुतात्म्यांना देखील श्रद्धांजली अर्पण केली जाते. नक्की वाचा: Maharashtra Din Wishes 2025: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत मराठी बांधवांसोबत आनंद करा द्विगुणित.
महाराष्ट्र राज्यामध्ये विशिष्ट अंतरावर भाषेत आणि खाद्यसंस्कृतीमध्येही बदल झालेले पहायला मिळतात. निसर्गसंपदेचं देखील महाराष्ट्राला वरदान लाभलेले आहे. त्यामुळे प्रतिभावंतांची खाण असलेल्या या महाराष्ट्र राज्याबद्दल अवश्य अभिमान बाळगा आणि आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तो जरूर व्यक्त करा. नक्की वाचा: Maharashtra Din 2025: आचार्य अत्रे यांचा हट्ट आणि राज्याला मिळालं 'महाराष्ट्र' हे नाव; पहा यापूर्वी काय ठरलं होतं नाव.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा






महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते. आजही 1 मे दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीचं औचित्य साधत दादर येथील शिवाजी पार्क मध्ये खास शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. राष्ट्रध्वज फडकवत राज्यपाल राज्यातील जनतेला संबोधित करतात.