
Mahaparinirvan Din 2022 Messages: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या, 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 साली दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' असं म्हंटल जातं. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो. पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला होता. बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला होता. अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन. [ हे देखील वाचा: Mahaparinirvan Din 2022 Quotes: महापरिनिर्वाण दिन निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook, WhatsApp द्वारा शेअर करत महामानवाला करा अभिवादन ]
पाहा





बाबासाहेब हे केवळ वैचारिक मांडणी करणारे विचारवंत किंवा तत्त्वज्ञच नव्हते, तर ते एक कृतिशील महापुरुष होते. या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.