Mahaparinirvan Din 2020 (File Image)

Mahaparinirvan Din 2020 Images: 6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच न्याय मिळवून देणारे, जातीय भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध लढणारे,  दलित समाजातील प्रत्येकाला मानाने जगण्याची शिकवण देणारे व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din 2020). बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. म्हणूनच, महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने त्यावर रोख लावण्यात आली आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे अभेद्य कवच दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन.

दलितांचे ते तलवार होऊन गेले

अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,

होते ते एक गरीबच पण या जगाचा

कोहिनूर होऊन गेले

जय भीम!

Mahaparinirvan Din 2020

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

भीमरायाची आठवण कधी मिटणार नाही,

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन... विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan Din 2020

हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता

अन्यायाविरूध्द लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता

असा रामजी बांबाचा लेक भिमराव आंबेडकर

 लाखात नाही तर जगात एक होता

जय भीम!

Mahaparinirvan Din 2020

नमन त्या पराक्रमाला

नमन त्या देशप्रेमाला

नमन त्या ज्ञान देवतेला

नमन त्या महापुरुषाला

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना

Mahaparinirvan Din 2020

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,

कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अश युगपुरुष, बोधिसत्व,

भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन... विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan Din 2020

दरम्यान, निधनापूर्वी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. (हेही वाचा: Mahaparinirvan Din 2020 Banner)

बौद्ध धर्माच्या अनुयायांना असे वाटते की, बाबासाहेबांनी दलितांसाठी केलेल्या कार्यामुळे ते या जीवनाच्या कर्मापासून मुक्त झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर ते जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटले आहेत, म्हणजेच त्यांना मोक्ष मिळाला आहे. म्हणजे त्यांचे महापरिनिर्वाण झाले आहे.