Maha Shivratri 2022 Date: महाशिवरात्रीच्या पुजेची वेळ, महत्त्व, प्रथा आणि विधी जाणून घ्या, पाहा व्हिडीओ
Mahashivratri 2021 Images (File Image)

महाशिवरात्री हा एक पवित्र हिंदू सण आहे जो मंगळवार,  1 मार्च 2022 रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला येतो. महाशिवरात्री ही सर्वात महत्वाची मानली जाते. हिंदू धर्मातील परंपरेसाठी हा शुभ प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यात भगवान शिवाची पूजा केली जाते.  धर्मशास्त्रमध्ये भगवान शिव हे सृष्टीचे निर्माते, संरक्षक आहे.

महाशिवरात्री 2022 पुजेची वेळ

महाशिवरात्रीचा शुभ सण चार टप्प्यात साजरा केला जाणार आहे, मंगळवार, 1 मार्च रोजी पहाटे 3.16 वाजता सुरू होईल.

महाशिवरात्री पूजा चरण  पूजा वेळ
प्रथम प्रहार पूजा वेळ मार्च 01,  संध्याकाळी  6.21 PM To 9.27 रात्री
दुसरी प्रहार पूजा वेळ मार्च 01, रात्री 9.27 PM To 12.33 AM रात्री
तिसरी प्रहार पूजा वेळ मार्च 02, रात्री  12:33 AM To 3.39 AM मध्यरात्री
चतुर्थ प्रहार पूजा वेळ मार्च 02, मध्यरात्री  3:39 AM To 6:45 AM पहाटे

महा शिवरात्री 2022 महत्त्व

हिंदू पौराणिक कथांनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. धर्मग्रंथानुसार लक्ष्मी, इंद्राणी, सरस्वती, गायत्री, सावित्री, सीता, पार्वती आणि रती या देवताही शिवरात्रीचे व्रत करतात. म्हणूनच भगवान शिवाचे भक्त शिवसाठी दिवसभर उपवास करतात. अविवाहित स्त्रिया चांगला वर मिळावा म्हणून व्रत ठेवतात, तर विवाहित स्त्रिया आपल्या नातेसंबंधात शांतता प्रेम समृद्धी आरोग्य इत्यादीच्या कामने साठी व्रत करतात. यावर्षी महाशिवरात्री पारयणाची वेळ किंवा उपवासाची वेळ 2 मार्च रोजी सकाळी 6:51 ते 1:00 पर्यंत आहे.

महाशिवरात्री 2022 प्रथा आणि विधी

महा शिवरात्रीच्या दिवशी भक्त शिव मंदिरांना भेट देतात आणि दूध, फळे, बेलपत्र आणि अर्पण करतात. शिवलिंगाला धतुरा अर्पण करतात. लोक समृद्धी आणि सुख आकर्षित करण्यासाठी ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. भक्त अगरबत्ती, दिवे लावतात, पांढरे वस्त्र, मिठाई, कोणतीही पाच फळे आणि पंचामृत भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करतात. महाशिवरात्रीला भगवान शंकराची ही विधीवत पूजा अहोरात्र चालू असते.