Maghi Ganesh Jayanti 2025 Rangoli Designs: भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लाडके पुत्र भगवान गणेश हे देवांमध्ये प्रथम पूजनीय मानले जातात, त्यांचा जन्म म्हणून गणेश जयंतीचा सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, तर माघी गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जात आहे, ज्याला माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी देखील म्हणतात. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणातील किनारपट्टीभागात धुमधडाक्यात साजरा केला जातो. माघी गणेश जयंतीला अनेक जण घरोघरी आणि मंडपात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. या सणाची शुभता वाढावी म्हणून रांगोळीच्या मनमोहक डिझाइनने घर-अंगण सजवले जाते. अशातच जर तुम्हीही रांगोळी डिझाइन्सच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मनमोहक रांगोळी डिझाइन्सचे ट्यूटोरियल व्हिडिओ, ज्याच्या मदतीने तुम्ही माघी गणेश जयंतीचा सण आणखी खास बनवू शकता.
माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील अशी आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ:

माघी गणेश जयंतीच्या सणाची तयारीही लोक अनेक दिवस अगोदरच सुरू करतात. आपली घरे सजवण्याबरोबरच लोक विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थही बनवतात आणि रांगोळी डिझाइनने घर-अंगणाच्या सौंदर्यात भर घालतात. दक्षिण भारतीय मान्यतेनुसार, या पवित्र दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता, म्हणून माघी गणेश जयंतीला भगवान शिव आणि माता पार्वतीचे लाडके पुत्र भगवान गणेशाची पूजा केली जाते.